Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

शोध तुझा...

October 06, 2017

Search by Tags:  शोध तुझा
खूपदिवसांचं प्रेम होत जवळपास ७-८ वर्ष झाली असतील कदाचित पण... पण मनांची अंतरे कमी पण भौगोलिक अंतरे वाढली होती... हळूहळू मी कामात व्यस्त होत गेलो न ती तिच्यातच कुठेतरी हरवून गेली, मी राहिलो तिला शोधत पण ती दूर माझ्यापासून होत राहिली... नंतर अचानक जे नको व्हायचं तेच घडलं न माझं सार आयुष्य अचानक बदलून गेलं कारण आता ती माझ्या आयुष्यात नव्हती आणि मी तिच्या....

हरवलं आहे काहीतरी
शोधूनही सापडेना
शोधावं तरी कुठवर
अंधारल्या डोळ्यात काहीच दिसेना
संध्याकाळ कशी झाली हि
होण्या आधीच सकाळ
कासावीस हा माझा जीव
न दिसता होई उदास
कुठं गेलीस तू सोडुनी
मज दूर अशी करुनि
जीव तू होती काळीज माझे
घाव रक्ताचा देऊनि
राहिलो मी आता एकटा
आसवात फार बुडूनी
थाऱ्यावर ना चित्त आता
चिता अशी पेटली
भिरभिर नजर माझी
तुलाच बघ शोधती
हात माझा एकटा
डोळे झाली पोरकी
शब्द झाले अबोलके
मीच मला अनोळखी
ये तू साजणा पुन्हा आता
उभा मी हात फैलुनी
मिठीत घे ना एकदा
झालं गेलं विसरुनी

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11
Search by Tags:  शोध तुझा
Top

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 427 hits